Akshata Chhatre
घासा खवखवणे हे प्रामुख्याने सर्दी, खोकला, किंवा घशात इन्फेक्शन झाल्यामुळे होते. थंड हवामान किंवा धूळ यामुळेही त्रास होतो.
तुळशीची पाने औषधी गुणांनी भरलेली असतात. चहात तुळशीची पाने टाकल्याने घशातील खवखव कमी होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
लवंगात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. चहामध्ये लवंग टाकल्याने खोकल्याचा त्रास कमी होतो आणि घसा शांत होतो.
काळ्या मिरीत अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुण असतात. ती चहात मिसळल्याने सर्दी आणि घशातील खवखव कमी होते.
एका कप पाण्यात तुळशीची पाने, लवंग, आणि काळी मिरी टाका. हे ५-७ मिनिटे उकळा. गाळून गरम गरम चहा प्या.
खोकल्याचा त्रास कमी होतो. सर्दी दूर होते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते
सर्दी, खोकला किंवा घासा खवखवत असेल तर डॉक्टरांकडे जाण्याआधी हे घरगुती उपाय करून पहा. ते सुरक्षित आणि प्रभावी असतात.