गोमन्तक डिजिटल टीम
म्हाऊस-सत्तरी येथील श्री रवळनाथ देवस्थाच्या पारंपरिक दसरोत्सव दि.१४ रोजीपर्यंत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
म्हापसा शहरात महारुद्र संस्थानतर्फे श्री हनुमंताची लालखी नगरप्रदक्षिणा झाली. आरतीनंतर पूजन करून सोने लुटण्याचा कार्यक्रम झाला.
धनगर समाज बांधवांच्या घरी तोरणे व मोटोळी बांधली जाते. त्याचप्रमाणे गजानृत्य सादर करून देवांची उपासना केली जाते. मृतात्म्यांना स्मशानात नैवेद्य देण्याची परंपरा जपली आहे.
गोकुळवाडी-साखळी येथील श्री राधाकृष्ण मुरलीधर संस्थानात नवरात्रोत्सवात भजन, आरती व मखरोत्सव झाल्यानंतर दसरोत्सव साजरा झाला.
महालवाडा-पैंगीण येथील श्री नवदुर्गा देवालयात अवतार कौलप्रसाद झाल्यानंतर लवाजम्याचे श्री वेताळ देवालयात आगमन झाले. महालवाडा येथे वृक्षाची पूजा केल्यानंतर त्याची पाने सोने म्हणून लुटण्यात आली.
पार्से येथील श्री भगवती देवस्थानाच्या भक्त निवासाची दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पायाभारणी करण्यात आली.
इथल्या भागातील सर्व एकत्रित मिळून दसरा साजरा करतात. तोरण बांधणे, सामूहिक आरती तर सर्वजण एकमेकांच्या घरी जाऊन चपय घालतात.