Puja Bonkile
देशभरात दसरा मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे.
दसरा हा सण अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो.
या दिवशी भगवान श्रीरामांनी लंकापती रावणाचा वध करून अधर्मावर धर्माचा विजय मिळवला.
विजयादशमीचा दिवस खूप खास असतो. या दिवशी तुम्ही ही झाडे घरात आणलीत तर तुमचे नशीब उजळू शकते.
विजयादशमीच्या दिवशी गोकर्णाचे रोप घरी आणा, या दिवशी गोकर्णाच्या रोपाची पूजा केल्यास अनेक समस्या दूर होतात.
दसऱ्याच्या दिवशी शमीचे रोप घरात आणणे खूप शुभ मानले जाते.