Sameer Panditrao
उन्हाळ्यात उष्णता, धूळ, अॅलर्जी किंवा शरीरातील पाण्याची कमतरता यामुळे कोरडा खोकला होऊ शकतो.
एक चमचा मध कोमट पाण्यात मिसळून पिल्यास घशाला आराम मिळतो आणि खोकला कमी होण्यास मदत होते.
आले उकळून तयार केलेला काढा पिल्याने घशातील खवखव कमी होते आणि कोरड्या खोकल्यावर आराम मिळतो.
तुळशीची काही पाने चघळल्यास किंवा काढा करून पिल्यास घशातील जळजळ कमी होते.
रात्री झोपण्यापूर्वी हळद घालून गरम दूध घेतल्यास खोकला आणि घशातील सूज कमी होण्यास मदत होते.
गरम पाण्याची वाफ घेतल्याने घशातील कोरडेपणा कमी होतो आणि श्वसनमार्ग मोकळा होतो.
भरपूर पाणी प्या आणि शरीराला विश्रांती द्या. त्यामुळे खोकला लवकर आटोक्यात येऊ शकतो.