बारा वर्षे, चार वर्ल्डकप अन् रोहित शर्माचं बदलत गेलेलं नशीब

Pranali Kodre

वर्ल्डकप 2023

5 सप्टेंबर रोजी वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी भारताच्या 15 जणांच्या संघाची घोषणा करण्यात आली. हा वनडेचा 13 वा वर्ल्डकप असून 5 ऑक्टोबरपासून भारतात खेळला जाणार आहे.

Rohit Sharma | Twitter

कर्णधारपद

या वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी 15 जणांच्या भारतीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे.

Rohit Sharma | Twitter

कर्णधार

त्यामुळे वनडे वर्ल्डकपमध्ये रोहित पहिल्यांदाच भारताचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

Rohit Sharma | Twitter

स्वप्नवत प्रवास

दरम्यान, वर्ल्डकपमध्ये कर्णधारपदापर्यंतचा रोहितचा हा प्रवास स्वप्नवत राहिला आहे.

Rohit Sharma | Twitter

वर्ल्डकप 2011

बारा वर्षांपूर्वी 2011 वर्ल्डकप स्पर्धा भारतात झाली होती. त्या स्पर्धेसाठी रोहित शर्माला भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे त्याने स्पष्टपणे नाराजीही व्यक्त केली होती.

Rohit Sharma | Twitter

वर्ल्डकप 2015

पण, त्यानंतर ऑस्ट्रेलियात झालेल्या 2015 वर्ल्डकप स्पर्धेत त्याची निवड झाली आणि तो सलामीवीर म्हणून भारतीय संघाकडून खेळला. त्याने 8 डावात 330 धावा केल्या होत्या.

Rohit Sharma | Twitter

वर्ल्डकप 2019

साल 2019 साल इंग्लंड आणि वेल्समध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत रोहितने सलामी फलंदाजी बरोबरच भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणूनही जबाबदारी सांभाळली. त्या वर्ल्डकपमध्ये त्याने सर्वाधिक धावा648 केल्या होत्या.

Rohit Sharma | Twitter

भारताचे नेतृत्व

आता पुन्हा 12 वर्षांनी भारतात वर्ल्डकपचे सामने खेळवले जाणार आहेत आणि या वर्ल्डकप 2023 मध्ये रोहित भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे,

Rohit Sharma | Twitter
Chinaman Bowling | Dainik Gomantak