Akshata Chhatre
समाजातील सौंदर्याची व्याख्या बऱ्याचदा त्वचेच्या रंगाशी जोडली जाते
पण खरी सुंदरता ही तुमच्या त्वचेच्या टोनमध्ये नव्हे, तर तिच्या आरोग्यात आणि तंदुरुस्तीमध्ये दडलेली आहे.
केवळ फेअरनेस क्रीम्स किंवा बाह्य उपचारांवर अवलंबून राहण्याऐवजी, त्वचेला आतून पोषण देणे गरजेचे आहे.
मुरुमे, डाग किंवा तेलकटपणा या समस्यांवर नैसर्गिक उपाय, योग्य आहार आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढणारे डिटॉक्स ड्रिंक हाच खरा प्रभावी उपाय आहे.
बडीशेप, जिरे आणि ओवा वापरून तयार केलेले हे साधे, पण शक्तिशाली पेय
नियमित घेतल्यास तुमची त्वचा हळूहळू स्वच्छ, उजळ आणि दीर्घकाळ नैसर्गिकरित्या चमकदार राहील.