Kavya Powar
आपल्यापैकी अनेकांना रात्री झोप न येण्याची समस्या असते
झोपण्यापूर्वी तुम्ही जर लिंबू आणि आल्याचा चहा प्यायलात तर तुमची ही समस्या दूर होऊ शकते
हा कॅफीन मुक्त हर्बल चहा आहे. यामुळे झोपेची कमतरता आणि अस्वस्थता दूर होते
लिंबू आणि आल्याचा चहा तुमचे मन शांत करतो, त्याचा मेंदूवरही चांगला परिणाम होतो, जो प्यायल्यानंतर तुम्ही चिंता आणि तणावापासून मुक्त होता.
अशा प्रकारचा चहा झोपण्यापूर्वी प्यायल्यास तुमची पचनशक्तीही सुधारते.
सकाळी तुमचे पोट साफ होते. बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या समस्येपासूनही तुम्हाला आराम मिळतो.
जर तुम्हाला सर्दी झाली असेल किंवा नाक बंद झाल्याचा त्रास होत असेल तर तुम्ही हा चहा पिऊ शकता.