गोमन्तक डिजिटल टीम
चतुर (कोकणीत भिरमूट/ इंग्रजीत ड्रॅगनफ्लाय) पाणथळ प्रदेश आणि पर्यावरणाच्या स्वास्थ्याचे महत्त्वाचे निर्देशक असतात.
एका विशिष्ट पाणथळ जागी संख्येने भरपूर असलेले निरोगी चतुर, तेथील पाणी स्वच्छ आहे असा संकेत देतात.
या पाण्यात अळ्यांना जगण्यासाठी पुरेसा विरघळलेला ऑक्सिजन आहे याचीही ती खूण असते. या तसेच डासांच्या अळ्या खाऊन डासांची संख्या नियंत्रण करण्यास चतुर मदत करतात.
‘वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर (WWF)- भारत’ ही संस्था भारतभर 'ड्रॅगनफ्लाय फेस्टिवल 2024' आयोजित करते.
सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांत गोव्यातील पाणथळ क्षेत्राचे निरीक्षण आणि सर्वेक्षण, विविध प्रजातींच्या चतुरांची ओळख, चर्चा आणि स्पर्धा असे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
गोव्यातील प्रसिद्ध नंदा आणि करमळी ही दोन तळी सर्वेक्षणासाठी निवडण्यात आली आहेत.
गोव्यात विविध प्रजातींचे चतुर मोठ्या प्रमाणात आहेत, ज्यात पश्चिम घाटातील अनेक स्थानिक प्रजातींचाही समावेश आहे.
सायक्लोगोम्फस फ्लेओएन्मुलाटस ही प्रजाती पहिल्यांदा गोव्यात 2013 मध्ये दिसली आणि 2018 मध्ये तिला मान्यता मिळाली.
गोव्यातल्या किनाऱ्यांवरती सकाळी फेरफटका मारायला आवडतो? मग 'ही' माहिती आहे खास तुमच्यासाठी..