Career Gap आहे? लपवू नका, परिस्थितीला असे करा डील

Manish Jadhav

आजकाल प्रत्येकाला चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे. नोकरी शोधण्याच्या प्रक्रियेदरम्यान अनेक वेळा कंपन्या करिअरमधील गॅपबाबत विचारतात. चला तर मग अशा संबंधित प्रश्नांची उत्तरे कशी द्यायची याविषयी जाणून घेऊया...

Job

प्रामाणिकपणा

आपण प्रामाणिकपणे करिअरमध्ये घेतलेल्या गॅपबद्दल सांगितले पाहिजे. याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती लपवू नये.

Intarviw | Dainik Gomantak

तुम्ही नवीन काय शिकलात...

तुम्ही करिअरमध्ये घेतलेल्या गॅपच्या कालावधीत काय नवीन शिकलात याबद्दल चांगल्या प्रकारे सांगू शकता. मग ते फ्रीलान्सिंग संबंधित असो किंवा कोणत्याही नवीन कौशल्याबाबत.

Office | Dainik Gomantak

करिअरमधील गॅपबाबत...

करिअरसंबंधीच्या प्रश्नांसाठी आपण तयार असले पाहिजे. विचारलेल्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे आपण दिली पाहिजेत. मग असे प्रश्न तुमच्या मागील कामाबद्दलही असू शकतात.

Ofiice | Dainik Gomantak

मागील कंपनीतील अनुभवाबाबत...

तुम्हाला करिअरमधील तुमच्या उद्दिष्टांबद्दल त्याचबरोबर मागील कंपनीतील तुमच्या योगदानाबद्दल विचारले जावू शकते. याबाबत तुम्ही चांगली तयारी करुन उत्तरे दिली पाहिजेत.

Office | Dainik Gomantak

तुम्ही करिअरबाबत काय विचार करता...

तुम्ही करिअरबाबत काय विचार करता? कंपनीसाठी तुम्ही काय योगदान देऊ शकता? असे अनेक प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. याबद्दल आपण तयारीने उत्तरे दिली पाहिजेत.

Interview | Dainik Gomantak

तुम्ही कोणत्या कारणासाठी गॅप घेतला होता?

तुमच्या आयुष्यात असा कोणता क्षणं आला ज्यावेळी तुम्हाला वाटले की, आता थांबावं लागणार आहे? असाही प्रश्न तुम्हाला नव्या कंपनीमध्ये विचारला जाऊ शकतो.

Office | Dainik Gomantak

सजगता...

नोकरीच्या प्रक्रियेदरम्यान आपण सजग असलो पाहिजे.

Interview | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी