Akshata Chhatre
तुम्ही कधी विचारही केला नसेल अशी एक प्रेम कहाणी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एका मुघल राजकुमाराची आणि पोर्तुगीज महिलेची.
औरंगजेबचा मुलगा शहा आलम एका पोर्तुगीज महिलेच्या प्रेमात होता, आणि याच प्रेमामुळे पोर्तुगीजांना मुघलांपासून अभय सुद्धा मिळालं होतं. काय आहे ही प्रेमकथा चला जाणून घेऊया.
तर झालं असं डोना जुलियाना दियास दा कोस्टा नावाच्या पोर्तुगीज महिलेचं शहा आलमवर प्रेम होतं. ज्युलियाना नामा या पुस्तकात या प्रेमप्रकरणाची माहिती मिळते.
१६४५मध्ये ज्युलियानाचा जन्म आग्रा येथे झाला होता. आई-वडिलांच्या निधनानंतर फादर अँटोनियो डी मॅगलहेन्स यांनी तिचा सांभाळ केला.
जुलियाना ही विधवा स्त्री होती. वर्ष १६८१-८२ मध्ये फादर अँटोनियो डी मॅगलहेन्स यांच्यामुळे ती मुघल दरबारात आली.
शहा आलमच्या शिक्षणाची जबाबदारी तिच्यावर सोपवण्यात आली होती आणि इथूनच त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले.
असं म्हणतात शहा आलमला औरंगजेबाने कैद केल्यानंतर तिने त्याची सुटका करवली होती. गोव्याला देखील तिने आर्थिक मदत केल्याचा उल्लेख आढळतो.