Akshata Chhatre
कोबी ही एक अत्यंत पौष्टिक आणि बहुगुणी भाजी आहे, जी कमी कॅलरी, भरपूर फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सने परिपूर्ण असते.
हृदय आणि त्वचेसाठी उत्तम तसेच वजन कमी करण्यास मदत करणारी ही भाजी क्रुसीफेरी कुटुंबातील आहे.
मात्र, कोबी कच्ची किंवा कमी शिजवून खाल्ल्यास टेपवर्मच्या अंडीचा धोका असतो, ज्यामुळे न्यूरोसिस्टिसरकोसिस सारखा गंभीर मेंदूचा आजार होऊ शकतो.
पण घाबरू नका! कोबी आणि टेपवर्मचा थेट संबंध नाही; दूषित पाणी, घाण खत किंवा अस्वच्छतेमुळे ही अंडी पानांना चिकटतात.
कोबी ६०°C तापमानाच्या गरम पाण्यात १० मिनिटे किंवा उकळत्या पाण्या ५ मिनिटे ठेवा. यामुळे टेपवर्मची अंडी नष्ट होतात.
१ लिटर पाण्यात १ चमचा मीठ किंवा पाणी आणि व्हिनेगर (३:१) च्या द्रावणात कोबी १५ मिनिटे ठेवा.
कोबीचे सर्वात बाहेरचे थर काढून टाका आणि कापण्यापूर्वी वाहत्या पाण्याखाली स्वच्छ धुवा.