Akshata Chhatre
गोव्याबद्दल जाणून घेणाऱ्यांना अनेकांना हाच प्रश्न पडतो की गोव्यात लोकं कोणती भाषा बोलत असतील?
काही जणांची अशी संकल्पना आहे की गोव्यात गोवनीज भाषाबोलली जाते. पण नेमकं सत्य काय?
गोवा, कोकण किनारपट्टीचा एक भाग असल्याने, येथे कोकणी ही सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे.
विकिपीडियाच्या माहितीनुसार, गोव्यातील ६१% लोक कोकणी भाषा बोलतात. ही भाषा गोव्याची ओळख बनली आहे.
महाराष्ट्राच्या जवळ असल्यामुळे, मराठी भाषेचा वापरही मोठ्या प्रमाणावर होतो.
गोव्यातील सुमारे १९% लोक मराठी बोलतात, ज्यामुळे ती देखील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा ठरते.
हिंदी आणि इंग्रजी भाषांचा वापर तुलनेने कमी आहे. हिंदी भाषा लहान गटांमध्ये बोलली जाते, तर इंग्रजीचा वापर मुख्यतः शहरी भागांमध्ये आणि पर्यटकांसोबतच्या संवादासाठी केला जातो.