पाँइंट्सटेबलमधील 'या' क्रमांकावरील टीम जिंकली सर्वाधिक वेळा IPL ट्रॉफी

Pranali Kodre

आयपीएल प्लेऑफ

आयपीएल 2023 स्पर्धेतील प्लेऑफमध्ये प्रवेश करणारे अंतिम चार संघ निश्चित झाले आहेत. आता 23 मे ते 28 मे दरम्यान प्लेऑफमधील क्वालिफायर्स, एलिमिनेटर आणि फायनल हे सामने रंगतील.

IPL Trophy | Twitter

टॉप 4 संघ

गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स हे चार संघांनी गुणतालिकेत अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा क्रमांक मिळवत प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.

IPL Captain | Twitter

मजेशीर आकडेवारी

पण तुम्हाला एक मजेशीर आकडेवारी माहित आहे का की गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या संघाने सर्वाधिकवेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.

Kolkata Knight Riders | Twitter

दुसऱ्या क्रमांकाचा संघ

आत्तापर्यंत पूर्ण झालेल्या 15 हंगामातील 7 हंगामात गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या संघाने आयपीएलची ट्रॉफी उंचावली आहे.

MI vs CSK | Twitter

तब्बल 7 वेळा विजेतेपद

विशेष म्हणजे 2011 ते 2015 असे सलग 5 वर्षी गुणतालिकेतील दुसऱ्या क्रमांकाच संघ आयपीएल विजेता ठरला होता. त्यानंतर 2018 आणि 2021 या वर्षीही दुसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या संघाने म्हणजेच चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.

Chennai Super Kings | Twitter

पहिल्या क्रमांकाचा संघ

त्यानंतर गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर राहणाऱ्या संघाने 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. यामध्ये 2008, 2017, 2019, 2020 आणि 2022 या पाच वर्षांचा समावेश आहे. यातील 2017, 2019, 2020 या तीनवर्षी मुंबई इंडियन्सने विजेतेपद जिंकले आहे.

Mumbai Indians | Twitter

तिसऱ्या क्रमांकाचा संघ

गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या संघाने आत्तापर्यंत 2 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. 2010 साली चेन्नई सुपर किंग्सने आणि 2016 साली सनरायझर्स हैदराबादने गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर राहिल्यानंतर आयपीएल विजेतपद पटकावले होते.

Sunrisers Hyderabad | Twitter

चौथ्या क्रमांकाचा संघ

त्याचबरोबर डेक्कन चार्जर्स असा एकमेव संघ आहे, ज्यांनी गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर राहिल्यानंतर आयपीएल विजेतेपदाला गवसणी घातली होती. त्यांनी 2009 मध्ये विजेतेपद पटकावले होते.

Deccan Chargers | Twitter
Shubman Gill Sister | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी