Cricket मधील आठ प्रकारचे Duck माहित आहेत का?

Pranali Kodre

क्रिकेटमध्ये डक ही कोणत्याही फलंदाजाला न आवडणारी, तर गोलंदाजाला हवीहवीशी गोष्ट आहे.

Cricket Duck | Dainik Gomantak

याचे कारणी अगदी सरळ आहे जेव्हा फलंदाज एकही धाव न करता शुन्यावर आऊट होतो, तेव्हा तो डक आऊट झाला असं म्हटलं जातं.

Cricket Duck | Dainik Gomantak

क्रिकेटमधील या डकचे एकूण 8 प्रकार आहेत.

Cricket Duck | Dainik Gomantak

१. गोल्डन डक

जेव्हा फलंदाज त्याचा पहिलाच अधिकृत चेंडूचा सामना करताना बाद होतो, तेव्हा त्याला गोल्डन डक म्हटले जाते.

Cricket Duck | Dainik Gomantak

2. सिल्व्हर डक

जेव्हा फलंदाज त्याचा दुसरा अधिकृत चेंडूचा सामना करताना शुन्यावर बाद होतो, तेव्हा त्याला सिल्व्हर डक म्हटले जाते.

Cricket Duck | Dainik Gomantak

3. ब्राँझ डक

जेव्हा फलंदाज त्याचा तिसरा अधिकृत चेंडूचा सामना करताना शुन्यावर बाद होतो, तेव्हा त्याला ब्राँझ डक म्हटले जाते.

Cricket Duck | Dainik Gomantak

4. डायमंड डक

जेव्हा फलंदाज कोणत्याही अधिकृत चेंडूचा सामना न करता शुन्यावर बाद होतो, तेव्हा त्याला डायमंड डक म्हटले जाते.

Cricket Duck | Dainik Gomantak

5. रॉयल डक

जेव्हा सलामीवीर फलंदाज संघाच्या डावाच्या सर्वात पहिल्या चेंडूवर बाद होतो, तेव्हा त्याला रॉयल डक म्हटले जाते.

Cricket Duck | Dainik Gomantak

6. लाफिंग डक

जेव्हा फलंदाज संघाच्या डावाच्या अखेरच्या चेंडूवर शुन्यावर बाद होतो, तेव्हा त्याला लाफिंग डक म्हटले जाते.

Cricket Duck | Dainik Gomantak

7. पेअर डक

जेव्हा फलंदाज कसोटी सामन्याच्या किंवा प्रथम श्रेणी सामन्याच्या दोन्ही डावात शुन्यावर बाद होतो, तेव्हा पेअर डक म्हटले जाते.

Cricket Duck | Dainik Gomantak

8. किंग पेअर डक

जेव्हा फलंदाज कसोटी सामन्याच्या किंवा प्रथम श्रेणी सामन्याच्या दोन्ही डावात त्याचा पहिलाच अधिकृत चेंडूचा सामना करताना बाद होतो, तेव्हा त्याला किंग पेअर डक म्हटले जाते.

Cricket Duck | Dainik Gomantak
MS Dhoni | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी