Priyanka Deshmukh
‘थायरॉईड’ हा आजच्या काळात एक सामान्य आजार झाला आहे.
जेव्हा थायरॉईड ग्रंथीमध्ये काही प्रकारचा अडथळा निर्माण होतो, तेव्हा ही ग्रंथी आवश्यकतेपेक्षा कमी-अधिक प्रमाणात हार्मोन्स सोडते.
अशा स्थितीत वजन वाढणे किंवा कमी होणे, स्मरणशक्ती कमी होणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, सांधेदुखी, इत्यादी समस्या उद्भवू शकतात
थायरॉईड ही ग्रंथी दोन प्रकारचे हार्मोन्स देखील तयार करते. एक T3 म्हणजे ट्रायओडोथायरोनिन आणि दुसरा T4 म्हणजे थायरॉक्सिन.
जेव्हा हे दोन संप्रेरक असंतुलित होतात, तेव्हा वजन वाढू शकते किंवा कमी होऊ शकते, ज्याला थायरॉईड म्हणतात.
थायरॉईडसाठी सर्वांगासन खूप फायदेशीर मानले जाते.