पावसाळ्यात 'या' गोष्टी चूकूनही खाऊ नका

दैनिक गोमन्तक

आरोग्य

पावसामध्ये डेंग्यू, मलेरिया, सर्दी, फ्लू असे अनेक आजार पाऊस सोबत आणतो. त्यामुळे या ऋतूत आपले आरोग्य उत्तम ठेवणे फार महत्त्वाचे असते.

Almonds | Dainik Gomantak

बुरशीचा संसर्ग

हिरव्या पालेभाज्या, पालक, लाल माठ, मेथी, कोबी, भेंडी अशा अनेक हिरव्या भाज्यांवर पावसाळ्यात बॅक्टेरिया आणि बुरशीचा संसर्ग होतो. 

Vegetables | Dainik Gomantak

चरबी आणि पित्त

तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. अशा प्रकारच्या अन्नामुळे शरीरातील चरबी आणि पित्त वाढते. जे शरीरासाठी अत्यंत हानिकारक असते.

Fried Foods | Dainik Gomantak

सीफूड

पावसाळ्यात मासे किंवा कोळंबीसारखे सीफूड खाणे टाळणे फार गरजेचे आहे. त्यामुळे या ऋतूत मासे खाल्ल्याने अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो. 

Sea Food | Dainik Gomantak

सॅलड

आरोग्यासाठी सॅलड हे महत्त्वाचे असले तरी देखील पावसाळ्याच्या ऋतूत ते खाणे आरोग्यासाठी फार धोकादायक मानले जाते. फक्त सॅलड नाही तर पावसाळ्यात काहीही कच्चे खाणे टाळा. 

Salad | Dainik Gomantak

बॅक्टेरिया

पावसाळ्यात दही खाणे आरोग्यासाठी योग्य नाही. कारण दह्यामध्ये बॅक्टेरिया आढळतात ते बॅक्टेरिया आरोग्यासाठी चांगले मानले जात नाहीत. 

Curd | Dainik Gomantak

 पचनसंस्था

पावसाळ्यात आपली पचनसंस्था खूप कमकुवत होते. त्यामुळे जड अन्न पचणे कठिण होते. अशा परिस्थितीत या ऋतूत मांसाहार टाळा.

Non Veg | Dainik Gomantak
Tea | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी