Akshata Chhatre
दिवाळी म्हणजे नुसता दिव्यांचा आणि आनंदाचा सण नाही, तर तो खमंग आणि चविष्ट पदार्थांचा उत्सव असतो.
या काळात घरी पाहुण्यांची सतत ये-जा असते.
अशावेळी, केवळ गोड पदार्थ खाऊन पाहुण्यांना कंटाळा येऊ नये म्हणून, फराळात चटकदार, खारट स्नॅक्सचा समावेश असणे आवश्यक आहे.
जर तुम्ही या दिवाळीत तुमच्या पाहुण्यांसाठी खास खमंग पदार्थ बनवण्याचा विचार करत असाल, तर या तीन सोप्या रेसिपीज नक्की करून पाहा.
मसाल्याचे काजू असोत, प्रोटिनयुक्त मुगाचे भजी असोत, किंवा महाराष्ट्राची पारंपारिक चकली असो.
या पदार्थांची अप्रतिम चव आणि खुसखुशीतपणा तुमच्या पाहुण्यांचे मन नक्कीच जिंकेल.
हे स्नॅक्स स्वादिष्ट असण्यासोबतच बनवायला सोपे आहेत आणि तुमच्या दिवाळीचा फराळ अधिक खास बनवतील.