Akshata Chhatre
सणासुदीचा काळ सुरू आहे आणि प्रत्येकाला आपल्या चेहऱ्यावर ग्लाससारखी चमक हवी असते, पण महागडे सॅलून उपचार प्रत्येकाला परवडणारे नसतात.
जर तुम्हाला घरी बसून नैसर्गिक पद्धतीने दिवाळीत चमकदार त्वचा हवी असेल, तर बीट आणि कोरफडीचा हा फेसपॅक नक्की वापरून पाहा.
बीटामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला डीटॉक्स करतात
आतून गुलाबी तजेला आणतात, उत्तम आणि टिकाऊ चमक मिळवण्यासाठी आठवड्यातून २-३ वेळा लावा आणि सोबतच पुरेसे पाणी प्या व पुरेशी झोप घ्या.
कोरफड जेल टॅनिंग कमी करून त्वचेला हायड्रेटेड आणि शांत ठेवते.
हा पॅक बनवण्यासाठी २ चमचे बीटचा रस, १ मोठा चमचा कोरफड जेल आणि गुलाबपाणी मिसळा.
तेलकट त्वचा असलेल्यांनी यात बेसन किंवा मुलतानी माती मिसळावी. पॅक १५ मिनिटे लावून कोमट पाण्याने धुवा.