Manish Jadhav
घरात पडलेल्या जुन्या सिल्क ट्रेडिशनल किंवा डिझायनर साड्यांचा वापर करून तुम्ही खिडक्यांसाठी पडदे, सोफ्याचे कव्हर्स किंवा कुशन्स बनवू शकता. यामुळे घराला झटपट ट्रेडिशनल आणि रॉयल लूक मिळतो.
काचेच्या रिकाम्या बाटल्यांवर पेंटिंग करुन किंवा त्यात लहान लाईट्स/झाडे लावून 'फ्लॉवर पॉट' म्हणून वापरा. जुन्या बॉक्सेसवर रंगीबेरंगी कागद चिकटवून आकर्षक स्टोरेज बॉक्स तयार करा.
सोफ्यावर किंवा जमिनीवरील बैठकीवर रंगीबेरंगी कव्हर्स असलेले उशा (कुशन्स) आणि सोपे सतरंजी/कारपेट वापरा. फक्त कव्हर्स बदलल्याने पूर्ण हॉलचा लूक नवीन आणि ताजा दिसू लागतो.
घरातील एका भिंतीवर घरातील सदस्यांचे छान फोटो किंवा मुलांनी काढलेली सुंदर चित्रे साध्या फ्रेममध्ये लावून 'मेमरी वॉल' तयार करा. यामुळे भिंत आकर्षक दिसेल आणि आठवणीही ताज्या राहतील.
घरात प्रसन्न वातावरण ठेवण्यासाठी सुगंधी मेणबत्त्या किंवा अगरबत्ती/धूप लावा. एका साध्या प्लेटमध्ये पाणी भरुन त्यात काही फुलांच्या पाकळ्या आणि तरंगत्या मेणबत्त्या ठेवल्यास घर क्षणात प्रसन्न दिसते.
मनी प्लांट, स्नेक प्लँट किंवा छोटी कुंडीतील झाडे लिव्हिंग रुम आणि खिडकीजवळ ठेवा. यामुळे घर नैसर्गिकरीत्या सुंदर दिसते, हवा शुद्ध राहते आणि सजावटीचा खर्चही खूप कमी येतो.