Skin Care: दिवाळीत उजळ, नितळ त्वचा हवी? मग आजच घरी तयार करा पारंपरिक आयुर्वेदिक उटणे

Sameer Amunekar

बेसन आणि हळदीचा वापर

दोन चमचे बेसन, अर्धा चमचा हळद आणि थोडं गुलाबपाणी एकत्र करून पेस्ट तयार करा. हे उटणे त्वचेतील मृत पेशी काढून टाकते आणि नैसर्गिक तेज वाढवते.

Skin Care | Dainik Gomantak

चंदन आणि केशर

एक चमचा चंदन पावडर आणि काही केशर धागे दुधात भिजवून लावा. यामुळे त्वचेला उजळपणा आणि मृदुता मिळते.

Skin Care | Dainik Gomantak

लिंबाचा रस आणि मध

लिंबाच्या रसात थोडा मध मिसळून चेहऱ्यावर हलक्या हाताने मालिश करा. हे नैसर्गिक ब्लीच म्हणून कार्य करते आणि डाग कमी करते.

Skin Care | Dainik Gomantak

मुलतानी माती आणि गुलाबपाणी

मुलतानी मातीमध्ये गुलाबपाणी आणि थोडं लिंबू मिसळून उटणे बनवा. हे त्वचेला थंडावा देते आणि तेलकटपणा कमी करते.

Skin Care | Dainik Gomantak

दुध आणि तांदुळाचे पीठ

तांदुळाचे पीठ आणि कच्चं दुध एकत्र करून चेहऱ्यावर लावा. हे स्क्रबसारखं काम करतं आणि त्वचा मऊ बनवते.

Skin Care | Dainik Gomantak

आवळा आणि हळदीचा लेप

सुक्या आवळ्याची पूड आणि हळद दहीत मिसळून चेहऱ्यावर लावा. हे कोलेजन वाढवते आणि वृद्धत्वाची चिन्हे कमी करते.

Skin Care | Dainik Gomantak

लावण्याची पद्धत आणि काळजी

उटणे नेहमी स्वच्छ चेहऱ्यावर लावा. १५–२० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. दर आठवड्यात दोनदा वापरल्यास त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.

Skin Care | Dainik Gomantak

फटाके फोडताना घ्या 'ही' खबरदारी

Diwali Safety Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा