गोमंतक ऑनलाईन टीम
घर, इमारती, वाहने आणि गर्दीच्या ठिकाणांपासून दूर मोकळ्या जागेत फटाके फोडा.
फटाके फोडताना नायलॉन किंवा सिंथेटिक कपडे टाळा. सुती कपडे आणि बंद शूज वापरा.
मुलांनी नेहमी मोठ्यांच्या देखरेखीखालीच फटाके फोडावेत. त्यांना सुरक्षित अंतरावर उभे राहण्यास सांगा.
फटाके फोडण्याच्या ठिकाणी पाणी किंवा वाळूची बादली ठेवा, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळेल.
फटाके जमिनीवर ठेवून लांबून पेटवा. पेटवल्यानंतर त्वरित सुरक्षित अंतरावर जा.
फटाका फुटला नाही तर पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करू नका. काही वेळ थांबून सुरक्षितपणे त्याची विल्हेवाट लावा.
फटाक्यांच्या ठिणग्या आणि मोठ्या आवाजापासून स्वतःचे संरक्षण करा. फटाके फोडताना योग्य अंतर राखा.