Akshata Chhatre
दिवाळीचा सण जवळ येताच मनात उत्साह आणि आनंद भरून राहतो.
रोषणाईच्या या पर्वात प्रत्येकाला आपले घर सर्वात खास आणि आकर्षक दिसावे असे वाटते.
घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पारंपरिक रांगोळी काढणे शुभ मानले जाते. यावर्षी रंगीत तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या वापरून नैसर्गिक रांगोळी काढा आणि मध्यभागी दिवे ठेवा.
मुख्य दारावर आंबा किंवा झेंडूच्या फुलांचे तोरण लावा, कारण त्यांचा सुगंध आणि रंग सणाचे वातावरण अधिक मनमोहक बनवतात.
याशिवाय, सोफ्यावरील कुशन कव्हर आणि पडदे बदलून तुम्ही तुमच्या बैठकीला एकदम नवीन लूक देऊ शकता. या
यासाठी फक्त विजेच्या माळा पुरेशा नाहीत! घराची शोभा वाढवण्यासाठी मातीच्या पणत्या तेल किंवा तुपाने लावा.
पणत्या वेगवेगळ्या उंचीच्या स्टँड्सवर ठेवून सुंदर नक्षी तयार करता येते.