गोमन्तक डिजिटल टीम
पर्यटकांसाठी गोवा हे समुद्री पर्यटनासाठी, नाईट लाईफसाठी आवडते ठिकाण आहे.
गोवा हा भारतातील निसर्गसंपन्न राज्यांपैकी एक आहे हे आपणास माहित आहे का?
राज्याचे एक तृतीयांश पेक्षाही जास्त क्षेत्र घनदाट जंगलांनी व्यापलेले आहे.
हे वनक्षेत्र जैवविविधतेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
गोव्याच्या जंगलांमध्ये अनेक औषधी वनस्पती, मोठी झाडे आढळतात.
वाघ, बिबट्या, हरीण, अस्वल, विविध प्रकारचे असे बरेच प्राणी जंगलांमध्ये आहेत.
गोव्याचे वनक्षेत्र हे राज्याच्या नैसर्गिक सौंदर्यात भर टाकणारे आणि पर्यावरणीय संतुलन राखणारे आहे. या जंगलांचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे.