Pranali Kodre
भारतीय क्रिकेट इतिहासात दिलीप सरदेसाई हे नाव आदराने घेतले जाते.
त्यामुळे ते भारतीय संघाकडून खेळणारे गोव्याचे पहिले क्रिकेटपटू ठरले.
दरम्यान, गोव्यात जन्म झाला असला, तरी त्यांनी त्यांचे बरेच क्रिकेट मुंबईत खेळले. ते देशांतर्गत क्रिकेटही मुंबई संघाकडूनच खेळले.
साल १९७१ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवणाऱ्या भारतीय संघातील ते प्रमुख खेळाडूंपैकी एक होते.
दिलीप सरदेसाई यांनी १९७१ च्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत ५ सामन्यांत ६४२ धावा फटकावल्या होत्या. ज्यात २ शतकांचा आणि १ द्विशतकाचा समावेश होता. ते परदेशात द्विशतक करणारे भारताचे पहिले क्रिकेटपटू होते.
दिलीप सरदेसाई संघात असताना मुंबईचा संघ रणजी ट्रॉफीमध्ये कोणताच सामना पराभूत झालेला नाही.
दिलीप सरदेसाई यांनी भारताकडून ३० कसोटी सामने खेळताना ५ शतके आणि ९ अर्धशतकांसह २००१ धावा केल्या. तसेच ते एकूण १७९ प्रथम श्रेणी सामने खेळले, ज्यात त्यांनी २५ शतके आणि ५६ अर्धशतकांसह १०२३० धावा केल्या.