Pramod Yadav
बॉलिवूडचे दिग्गज, ट्रॅजेडी किंग दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांची रविवारी 100 वी जयंती साजरी झाली.
दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी पाकिस्तानातील पेशावरमधील किस्सा ख्वानी बाजार येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.
दिलीप कुमार यांचे खरं नाव मोहम्मद युसूफ खान होते.
दिलीप कुमार यांचा काळ असलेले 1950 आणि 1960 हे दशक त्यांच्यासोबत हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ म्हणून ओळखले जाते.
1949 मध्ये मेहबूब खान यांच्या अंदाज या चित्रपटातून दिलीप कुमार स्टार झाले.
दिलीप कुमार यांनी 'पैगम', 'राम और श्याम', 'आन', 'कोहिनूर' आणि 'मुगल-ए-आझम' यांसारख्या अनेक चित्रपटांतून अभिनय कौशल्य दाखवले आहे.
भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी झालेल्या एका आंदोलनात दिलीप कुमार यांना अटक झाली होती.
दिलीप कुमार यांचा 'मुगल-ए-आझम' चित्रपटातील भूमिका आजही आजरामर मानली जाते.
त्याचा देवदास देखील त्याकाळी खूप गाजला होता. दिलीप कुमार यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले.
दिलीप कुमार यांनी 'दिलीप कुमार: द सबस्टन्स अँड द शॅडो' या आत्मचरित्रात त्यांच्या जीवनप्रवासाची कहाणी लिहिली आहे.