Akshata Chhatre
पोटाच्या आरोग्याकडे बऱ्याच लोकांकडून दुर्लक्ष केले जाते. बऱ्याच वेळा आपण फिटनेसमध्ये खूप वरवरचा विचार करतो; परंतु खरा फिटनेस म्हणजे पोटाचे आरोग्य आहे.
योग्य वर्कआऊट रूटिन केवळ आपली पचनप्रक्रिया प्रमाणात राखतो असे नाही, तर आपल्या मायक्रो बायोम संतुलित करते.
पोटाचे आरोग्य म्हणजे केवळ पचनप्रक्रिया नाही, तर त्यापलीकडे काहीतरी आहे.
व्यायाम आणि हालचालीमुळे पचनसंस्थेला नैसर्गिक कार्यासाठी मदत करते. त्यामुळे पचन सुरळीत होते. बद्धकोष्ठता होत नाही.
व्यायामामुळे पचनसंस्थेला रक्ताचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो, ऑक्सिजनचे प्रमाण संतुलित ठेवता येते.
शरीराची हालचाल-विशेषत: मध्यम पातळीचा व्यायाम आपल्या शरीरातली दाहकता कमी करतो ज्यामुळे पोटाचे आरोग्य सुधारते.
शरीराची हालचाल आपल्या चयापचयाला गती देऊ शकते, अन्नावर अधिक कार्यक्षमतेने प्रक्रिया करण्यास मदत करते. शरीराची जाडी आणि सुस्तपणा कमी करते.