Puja Bonkile
हिंदु धर्मात तुळशीला अनन्य साधारण महत्व आहे.
रामा तुळस आणि कृष्ण तुळस असे तुळशीचे दोन प्रकार आहेत.
असे मानले जाते की रामाला तुळस प्रिय असल्याने त्याला राम तुळस म्हणतात.
राम तुळस घरात लावल्यास सुख-समृद्धी लाभते.
कृष्ण तुळस ही जांभळ्या रंगाची असते.
या तुळशीचे पाने भगवान कृष्णासारखी असल्याने त्याला हे नाव दिले आहे.
दोन्ही तुळशींना खुप महत्व आहे.
तुळशीचे रोप गुरुवार, शुक्रवारी लावणे शुभ मानले जाते.
तुळशीचा चहा पिल्यास अनेक आरोग्यदायी फायदे होतात.