नितळ त्वचेसाठी असा असावा आहार

दैनिक गोमन्तक

नितळ त्वचा असेल तर सौंदर्यप्रसाधनांची गरज पडत नाही. अशा त्वचेसाठी योग्य आहार असणे गरजेचे असते.

Skin Care | Dainik Gomantak

काय करु नये?

ताण-तणाव व अपुरी झोप, धूम्रपान व मद्यसेवन, विशिष्ट औषधं, ॲलजी, प्रदूषण इत्यादी सर्वांचा विपरीत परिणाम दिसू लागतो. त्यामुळे त्वचा काळवंडते, त्वचेवर पिंगमटेशन दिसतं, मुरूम येतात, त्वचा निस्तेज दिसते.

Skin Care | Dainik Gomantak

योग्य आहार

आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करावे. त्यातील अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेला चमक आणण्यास मदत करतात.

Skin Care | Dainik Gomantak

क जीवनसत्त्व

याबरोबरच, आहारात क जीवनसत्त्वयुक्त फळांचा समावेश करावा. लिंबू, संत्री, मोसंबी, आवळा, आलुबुखार, स्ट्रॉबेरी, पेरू या फळांपासून मिळणाऱ्या क जीवनसत्त्वामुळे, त्वचेला सूर्यकिरणामुळे होणाऱ्या हानीला आळा बसतो व नवीन पेशी निर्माण घेण्यास मदत होते.

Skin Care | Dainik Gomantak

बदाम, अक्रोड, तेलबिया, जवस मधील ओमेगा -३ फॅटी ॲसिडमुळे त्वचेला पोषण मिळते

Skin Care | Dainik Gomantak

पाणी

चांगल्या त्वचेसाठी पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. घाम, उच्छ्वास, मल-मूत्र याद्वारे शरीरातून विषारी, अपायकारक पदार्थ बाहेर टाकले जातात. त्यामुळे पाण्याचे प्रमाण योग्य राखले पाहिजे.

Skin Care | Dainik Gomantak

प्रथिने

कोलॅजेन निर्मितीसाठी प्रथिनांचा सहभाग असतो. वनस्पतिजन्य व प्राणिजन्य प्रथिने उदाहरणार्थ, डाळी, उसळी, सोयाबीन, अंडी, मासे, चिकन या सर्वांपासून मिळणाऱ्या प्रथिनांमुळे कोलॅजेनची निर्मिती होण्यास मदत होते आणि त्वचेचा पोत चांगला राहतो.

Skin Care | Dainik Gomantak
Black Pepper | Dainik Gomantak
अजून बघण्यासाठी