Pranali Kodre
भारताचा दिग्गज कर्णधार एमएस धोनीचा 7 जुलैला वाढदिवस असतो. त्यामुळे त्यादिवशी त्याला जगभरातून शुभेच्छा मिळतात.
धोनीबरोबरच भारताचा युवा क्रिकेटपटू देवदत्त पडिक्कल देखील 7 जुलैला त्याच्या वाढदिवस साजरा करतो. Devdutt Padikkal
पडिक्कलचा जन्म 7 जुलै 2000 रोजी केरळमधील इडापल येथे झाला.
पडिक्कलचा जन्म केरळमध्ये झाला असला, तरी तो कर्नाटकमध्ये स्थायिक झालेला असल्याने कर्नाटककडूनच देशांतर्गत क्रिकेट खेळतो.
पडिक्कलने जुलै 2021 मध्ये भारताकडून दोन आंतरराष्ट्रीय टी20 सामनेही खेळले आहेत.
पडिक्कल भारत अ संघाकडूनही खेळला आहे.
आयपीएलमध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्सकडून खेळला आहे.
पडिक्कलने त्याच्या कारकिर्दीत 24 प्रथम श्रेणी सामने खेळले असून 2 शतकांसह 1450 धावा केल्या आहेत. 22 लिस्ट ए सामने खेळले असून 6 शतके आणि 8 अर्धशतकांसह 1391 धावा केल्या आहेत.
पडिक्कलने 87 टी20 सामनेही खेळले असून यात 3 शतकांसह 2649 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 57 आयपीएल सामन्यांचा समावेश आहे. त्याने आयपीएलमध्ये 1 शतकांसह 1521 धावा केल्या आहेत.