IPLच्या धामधुमीत दिल्ली कॅपिटल्सच्या मार्शनं उरकलं लग्न

Pranali Kodre

भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा 16 वा हंगाम सुरू असतानाच दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू मिचेल मार्श लग्नबंधनात अडकला आहे.

Mitchell Marsh - Greta Mack | Dainik Gomantak

मार्शने त्याची दीर्घकाळाची गर्लफ्रेंड ग्रेटा मॅकबरोबर साऊथ वेस्ट ऑस्ट्रेलियामध्ये लग्न केले आहे.

Mitchell Marsh - Greta Mack | Dainik Gomantak

त्यांच्या लग्नासाठी त्याचं कुटुंबिय आणि मित्रपरिवार उपस्थित होता.

Mitchell Marsh - Greta Mack | Dainik Gomantak

लग्नसोहळ्यावेळी मार्शने काळा सुट आणि ग्रेटाने सुंदर पांढरा गाऊन परिधान केला होता.

Mitchell Marsh - Greta Mack | Dainik Gomantak

मिचेल मार्श आणि ग्रेटाला त्यांच्या लग्नानिमित्त अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनीही शुभेच्छा दिल्या आहेत.

Mitchell Marsh - Greta Mack | Dainik Gomantak

खरंतर मार्श आयपीएल 2023 स्पर्धा खेळण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाच सामील झाला होता आणि सुरुवातीचे सामनेही तो खेळला होता.

Mitchell Marsh | Dainik Gomantak

इतकेच नाही, तर तो गेल्या महिन्यापासून भारतात होता, त्याने गेल्या महिन्यात भारताविरुद्ध वनडे मालिकाही खेळली, त्यानंतर तो आयपीएल २०२३ साठी दिल्ली संघात सामील झाला होता.

Mitchell Marsh | Dainik Gomantak

पण त्याच्या लग्नानिमित्त तो आयपीएलचा पहिला आठवडा सुरु असतानाच परत मायदेशी परतला.

Mitchell Marsh | Dainik Gomantak

त्यामुळे तो दिल्ली कॅपिटल्सच्या काही सामन्यांना मुकला असून आता पुन्हा तो आयपीएल 2023 स्पर्धा खेळण्यासाठी भारतात येणार आहे.

Mitchell Marsh | Dainik Gomantak
Rinku Singh | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी