Pranali Kodre
भारताची अष्टपैलू दीप्ती शर्माने 15 फेब्रुवारी 2023 रोजी मोठा इतिहास रचला.
दीप्तीने महिला टी20 वर्ल्डकप 2023 स्पर्धेत वेस्ट इंडिज विरुद्ध खेळताना तिच्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीत 100 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.
दीप्ती आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेणारी भारताची महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंपैकी पहिलीच खेळाडू ठरली आहे.
त्यामुळे दीप्ती भारताकडून सर्वाधिक टी20 विकेट्स घेणारी गोलंदाज आहे.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर 98 विकेट्ससह पूनम यादव आहे.
तसेच 91 विकेट्सह युजवेंद्र चहल तिसऱ्या क्रमांकावर आहे.
भुवनेश्वर कुमारने 90 विकेट्स घेतल्या असून तो या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
आर अश्विन या यादीत पाचव्या क्रमांकवर असून त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 72 विकेट्स घेतल्या आहेत.