गोमन्तक डिजिटल टीम
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर डेविड वाॅर्नरने अचानक एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली आहे.
डेविड वाॅर्नरने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळलेली त्याची खेळी ही त्याची शेवटची वनडे खेळी असेल.
सिडनी कसोटीपूर्वी जेव्हा डेव्हिड वॉर्नर पत्रकार परिषदेसाठी आला तेव्हा त्याने अचानक ही घोषणा केली.
डेविड वाॅर्नरच्या फलंदाजीचे ऑस्ट्रेलियासह भारतात देखील अनेक चाहते आहेत. अचानक घेतलेल्या निर्णयामुळे अनेक चाहते नाराज आहेत.
डेविड वाॅर्नर सध्या टी-२० आणि आयपीएल खेळत राहणार आहे.
डेविड वॉर्नरने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्याचे दरवाजे खुले ठेवले आहेत.
डेविड वाॅर्नरने एकदिवसीय कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, त्याने 2009 मध्ये पदार्पण केले.