Akshata Chhatre
सासू-सुनेमधलं नातं बर्याचदा कुरबुरींनी भरलेलं असतं, पण त्याचा मानसिक तणाव दूर ठेवण्यासाठी काही स्मार्ट उपाय तुम्हाला शांत आणि समजूतदार ठेवू शकतात.
जर सासूबाई सतत अडवतात किंवा टोमणे मारतात, तर प्रत्येक गोष्टीला उत्तर न देता, फक्त हसून टाका आणि विषय बदलून टाका. संवादात आवश्यक तेवढंच सहभागी व्हा.
जेव्हा एखाद्या विषयावर वाद होण्याची शक्यता असेल, तेव्हा त्या चर्चेला मर्यादा ठेवा. प्रत्येक मुद्द्यावर चर्चेला ओढून न नेता, शांततेने तो विषय टाळणं अधिक शहाणपणाचं ठरतं.
भावना व्यक्त करा
जर एखादी गोष्ट तुम्हाला दुखावत असेल, तर ती शांतपणे आणि आदराने व्यक्त करा. गप्प बसल्याने साचलेला राग वाढतो. आत्मसन्मानासाठी उभं राहणं ही तुमची जबाबदारी आहे.
शांतपणे आणि आत्मविश्वासाने बोलणं, डोळ्यात डोळे घालून संवाद साधणं, यामुळे तुमचं मत समोरच्या व्यक्तीला प्रभावी वाटतं. संयम राखा, पण कमकुवत देखील वाटू देऊ नका.
सासूबाई कधी बदलेल याची वाट न पाहता स्वतःला खुश ठेवा. छंद जोपासा, मित्रमैत्रिणींना भेटा, नवीन गोष्टी शिका. स्वतः आनंदी राहिलात तर इतरांच्या नकारात्मकतेचा तुमच्यावर परिणाम होणार नाही.
थोडा संयम, थोडं समजून घेणं आणि स्वतःवर लक्ष केंद्रित केल्यास सासू-सुनेचं नातंही सौहार्दपूर्ण आणि शांततेनं नांदू शकतं.