Akshata Chhatre
चेहऱ्याच्या सौंदर्यात गुलाबी ओठांची भूमिका महत्त्वाची असते, पण बदलत्या जीवनशैलीमुळे ओठ काळे पडू लागतात.
यामुळे केवळ चेहऱ्याचे सौंदर्यच कमी होत नाही, तर आत्मविश्वासही खालावतो.
योग्य काळजी घेतल्यास आणि काही साधे घरगुती उपाय नियमितपणे वापरल्यास ओठांचा नैसर्गिक गुलाबी रंग परत मिळवणे सहज शक्य आहे.
लिंबू आणि मध, बीटचा रस किंवा गुलाबाच्या पाकळ्यांचा लेप यांसारख्या उपायांनी ओठांची रंगत सुधारते.
पुरेसे पाणी पिणे आणि धुम्रपान टाळणे यांसारख्या सवयींमध्ये बदल करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
ओठांना एसपीएफयुक्त लिप बाम आणि रात्री बदाम तेल लावून तुम्ही तुमचे ओठ पुन्हा नैसर्गिकरित्या आकर्षक आणि चमकदार बनवू शकता.
फक्त १० दिवसात नैसर्गिक गुलाबी रंग परत मिळवण्यासाठी सोपे उपाय पुरेसे आहेत.