Akshata Chhatre
शरीराची काळजी घेताना आपण चेहरा, हात-पाय स्वच्छ ठेवतो, पण पायांचे घोटे अनेकदा दुर्लक्षित राहतात.
धूळ, माती, घर्षण आणि शरीराच्या वजनामुळे या भागावर काळेपणा आणि डेड स्किन जमा होते.
यामुळे स्वच्छतेची काळजी घेतली तरी घोटे अस्वच्छ आणि खडबडीत वाटतात. यावर एक सोपा घरगुती स्किन केअर रूटीन तुमच्या उपयोगी येऊ शकतो.
एका टबमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात थोडं मीठ टाका. पाय १०-१५ मिनिटे या पाण्यात भिजवा. यामुळे त्वचा मऊ होते आणि डेड स्किन सहज निघते.
पाय पुसून हलक्या हाताने प्युमिक स्टोन (खडबडीत दगड) वापरून घोट्यांवरून घासा. जोरात घासू नका, त्वचा जखमी होऊ शकते.
१ चमचा कॉफी पावडर, १ चमचा तांदळाचं पीठ, १ चमचा मध सर्व एकत्र करून लेप तयार करा. घोट्यांवर लावा, ५-७ मिनिटं सुकू द्या. अर्धवट सुकल्यावर हाताने चोळा.
उपाय झाल्यावर पाय पुसून त्यावर नारळ तेल किंवा मॉइश्चरायझरलावा. यामुळे त्वचा मऊ व तजेलदार राहते.