Akshata Chhatre
डोळ्याखालची काळी वर्तुळे ही अपुरी झोप, ताण, स्क्रीनसमोरचा जास्त वेळ किंवा पाण्याची कमतरता यामुळे दिसू लागतात
त्यामुळे व्यक्तिमत्त्वावर नकारात्मक छाप पडते, अशा वेळी केमिकल क्रीमपेक्षा घरगुती उपाय जास्त सुरक्षित आणि परिणामकारक ठरतात.
हळदीतील दाहशामक गुणधर्म डोळ्यांखालची त्वचा उजळवतात आणि सूज कमी करतात
एलोवेरा जेलमध्ये हळद किंवा मध मिसळून लावल्यास त्वचेला तजेलदारपणा व ओलावा मिळतो
बटाट्याच्या रसातील नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म काळसरपणा कमी करण्यास मदत करतात
एलोवेरा स्वतंत्रपणे लावल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि डोळ्यांखालची त्वचा थंड व निरोगी होते.
किमान ७–८ तास झोप घेणे, पुरेसे पाणी पिणे, स्क्रीन टाइम कमी करणे आणि आहारात पालेभाज्या, फळे व व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थांचा समावेश करणे यामुळे चेहरा अधिक ताजेतवाने व आकर्षक दिसतो.