Akshata Chhatre
थंडीची चाहूल लागताच अनेकांच्या केसांमध्ये कोंड्याचा त्रास वाढू लागतो.
अशा परिस्थितीत, महागड्या उत्पादनांवर अवलंबून न राहता, तुम्ही घरगुती नैसर्गिक उपायांचा वापर करू शकता.
कोंडा समूळ नष्ट करण्यासाठी एक प्रभावी घरगुती नुस्का आहे. ज्यात बेकिंग सोडा, काळी मिरी, दही आणि मुलतानी माती या ४ गोष्टींचा समावेश आहे.
नैसर्गिक एक्सफोलिएटरप्रमाणे काम करतो, मृत त्वचा आणि घाण काढून टाकतो आणि अँटीफंगल गुणांमुळे कोंडा निर्माण करणाऱ्या बुरशीचा नाश करतो.
अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल असल्याने रक्तप्रवाह सुधारते आणि मुळे मजबूत करते.
दह्यातील लॅक्टिक ॲसिड स्कॅल्पची सफाई करते, थंडावा आणि आर्द्रता देऊन खाज कमी करते.
मुलतानी माती अतिरिक्त तेल, घाण आणि मृत पेशी शोषून घेते, ज्यामुळे कोंड्याची पकड ढिली होते.