Akshata Chhatre
केसांतील कोंडा किंवा डँड्रफ ही खूपच सामान्य समस्या असून, ती केवळ केसांच्या सौंदर्यावरच नव्हे, तर आत्मविश्वासावरही परिणाम करते.
सुरुवातीला डोक्यात खाज येते, मग पांढरे कण दिसू लागतात आणि ते कपड्यांवर पडून लाज वाटते.
अनेकदा केस धुतल्यावर काही दिवसांनी पुन्हा कोंडा दिसतोच. बाजारात मिळणाऱ्या महागड्या शाम्पू आणि तेलांचा परिणाम बहुतेक वेळा तात्पुरता असतो.
घरगुती उपायांमध्ये स्वयंपाकघरात सहज मिळणारा ओवा खूपच उपयुक्त ठरतो. ओव्यामध्ये असणारा थायमॉल नावाचा घटक फंगल वाढ थांबवतो आणि खाज, जळजळ यावर आराम देतो.
२ चमचे ओवा एका ग्लास पाण्यात १० मिनिटं उकळा. पाणी गार झाल्यावर गाळून, केस धुतल्यानंतर शेवटच्या पाण्याच्या जागी या पाण्याने केस धुवा.
अर्धा कप खोबरेल तेलात २ टेबलस्पून ओवा घालून ५–७ मिनिटं मंद आचेवर गरम करा. गार झाल्यावर गाळून घ्या. आठवड्यातून दोनदा हे तेल गरम करून मुळांमध्ये मसाज करा
२ चमचे ओवा दह्यात मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट स्काल्पवर लावून ३० मिनिटांनी धुवा. दह्याचे प्रॉबायोटिक्स स्काल्पला हायड्रेट करतात.