दैनिक गोमन्तक
आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपण विविध प्रकारचे व्यायामाचा आपल्या दैनंदीन आयुष्यात अवलंब करत असतो.
मात्र तुम्हाला हे माहीत आहे का जर दररोज 10-15 मिनिटे डान्स केला तर त्याचा तुमच्या आरोग्यासाठी मोठा फायदा होतो.
ताणतणाव कमी होतो आणि नैराश्य कमी होते. तुमचे मानसिक आरोग्य चांगले राहते.
डान्समुळे मेंदूचे आरोग्य सुधारते याबरोबरच स्मरणशक्तीदेखील वाढते.
शरीराची लवचिकता वाढते.
उत्साह वाढतो आणि आळस दूर होतो
डान्समुळे रक्ताभिसरण वाढते आणि त्यामुळे तुमच्या शरीराला योग्य ऑक्सिजन पुरवठादेखील होतो.