Akshay Nirmale
दरम्यान, दामोदर मावजो हे गोव्याचे दुसले लेखक आहेत ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्यापुर्वी 2008 साली दिवंगत रवींद्र केळेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता.
दामोदर मावजो यांचा जन्म 1 ऑगस्ट 1944 रोजी दक्षिण गोव्यातील माजोर्डा गावात झाला.
मावजो यांची सुमारे 25 पुस्तके कोकणी भाषेत आणि एक पुस्तक इंग्रजी भाषेत प्रकाशित झाले आहे. त्यांच्या साहित्यकृतींचे अनेक भारतीय तसेच परदेशी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.
गोवा स्वातंत्र्यलढा, कोकणी भाषेचे संवर्धन आणि गोव्याचे पर्यावरण यासंबंधीच्या चळवळींमध्ये ते सक्रिय राहिले आहेत.
मावजो यांना यापुर्वी 1988 साली सर्जनशील फिक्शनसाठीचा कथा पुरस्कार, 1997 साली गोवा राज्य फिल्म महोत्सवात उत्कृष्ट संवाद लेखन पुरस्कार, कला अकादमी पुरस्कार, कोकणी भाषा मंडळ पुरस्कार मिळाला आहे.
2011-12 साली त्यांना केंद्रीय संस्कृती मंत्रालयाची फेलोशिप मिळाली. 2011 साली ‘त्सुनामी सायमन’ या कादंबरीसाठी त्यांना विमला पै विश्व कोकणी साहित्य पुरस्कार मिळाला.
मावजो यांच्या ‘तेरेसाज मॅन अॅण्ड अदर स्टेरीज फ्रॉम गोवा’या कथासंग्रहाला 2015 साली फ्रँक ओ कॉनोर आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.
साहित्य अकादमीवर त्यांनी अनेक पदे भूषविली आहेत. साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळावर ते सदस्यही होते.