Akshata Chhatre
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या आहारामुळे पोटात गॅस होणे ही एक सामान्य पण त्रासदायक समस्या बनली आहे.
वेळच्या वेळी जेवण न करणे, वारंवार गरम केलेले अन्न खाणे, झोपेची कमतरता आणि मानसिक तणाव यामुळे पचनक्रियेवर ताण येतो. त्यामुळे पोट फुगणे, गच्चपणा, सूज आणि अस्वस्थता जाणवू लागते.
ही समस्या जास्त करून रात्री वाढते आणि त्यामुळे झोपेवरही परिणाम होतो. काही घरगुती उपाय नियमितपणे केल्यास यावर सहज नियंत्रण ठेवता येते.
ओवा आणि काळं मीठ कोमट पाण्यासोबत घेतल्यास त्वरित आराम मिळतो, तर कोमट पाण्यात हिंग टाकून प्यायल्याने पोटातील गॅस बाहेर पडतो.
आल्याचा रस व मध, बडीशेपाचं पाणी, तसेच दालचिनी आणि कडीपत्त्याचा वापर यामुळेही पचन सुधारते आणि त्रास कमी होतो.
याशिवाय, पवनमुक्तासन आणि भुजंगासन यांसारख्या योगासने आणि हलका व्यायाम केल्यास पचनसंस्था मजबूत राहते.
गॅसची समस्या वारंवार होत असल्यास आहार आणि दिनचर्येत बदल करणे गरजेचे आहे. तरीही त्रास सतत होत असल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.