Akshata Chhatre
हिवाळ्यात थंड वाऱ्यांमुळे त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज होते.
यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो आणि मेलेनिनचे उत्पादन वाढते, परिणामी हात-पाय आणि बोटांवर काळेपणा किंवा हायपरपिगमेंटेशन दिसू लागते.
केवळ लोशन लावल्याने या काळसरपणामध्ये सुधारणा होत नाही, तर त्यासाठी त्वचेचे डेड सेल्स काढणे आवश्यक असते.
या समस्येवर मात करण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टर एक सोपा आणि प्रभावी नैसर्गिक उपाय सांगतात, ज्यात फक्त दोन वस्तूंचा वापर केला जातो; लिंबू आणि साखर.
लिंबू अर्धा कापून घ्या आणि त्यावर साखरेचे बारीक नसलेले दाणे ठेवा. हे साखर लावलेले लिंबू हलके दाबून हात आणि पायांवर, विशेषत: बोटांवर, घासा.
१० मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवा.
लिंबू यात नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म आहेत, जे काळसरपणा हलका करतात. साखर हे उत्कृष्ट एक्सफोलिएटर म्हणून काम करते, ज्यामुळे त्वचेवरील डेड सेल्सचा थर निघून जातो.