कुंभारजुवेकरीण देवीचा वार्षिक सांगडोत्सव; पहा फोटो

Kavya Powar

सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेला श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवीचा वार्षिक सांगडोत्सव यंदा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.

Cumbarjua Sangod Utsav | Dainik Gomantak

उत्सवाप्रसंगी सर्वांनी धर्म, जात, पात बाजूला ठेवून गुण्यागोविंदाने एकत्र येत सर्वजण यात सहभागी होतात

Cumbarjua Sangod Utsav | Dainik Gomantak

पोर्तुगीजकालीन पध्दत

गणपती विसर्जनाची अनोखी आणि जुनी पोर्तुगीजकालीन पध्दत म्हणजे कुंभारजुवे माशेल- सांगोडोत्सव होय. 

Cumbarjua Sangod Utsav | Dainik Gomantak

कुंभारजुवेवासिय

ही प्रथा माशेल -कुंभारजुवेवासियांनी आजही अत्यंत भक्तिभावाने जपली आहे. 

Cumbarjua Sangod Utsav | Dainik Gomantak

फॅन्सी देखावे

वर्षानुवर्षे ह्या परंपरेत नवे बदल होत असून आता सांगोडाची संख्या आणि पौराणिक देखाव्यांबरोबर नवे फॅन्सी देखावे यंदाही साकारले होते.

Cumbarjua Sangod Utsav | Dainik Gomantak

रसिकांची गर्दी

नदी किनारी सांगोडोत्सव पाहण्यासाठी रसिकांची गर्दी होते

Cumbarjua Sangod Utsav | Dainik Gomantak

आनंदाची पर्वणीच

कुंभारजुवे नदीच्या पात्रात साजरा होणारा सांगोडोत्सव म्हणजे माशेल - कुंभारजुवेच नव्हे, तर गोव्यातल्या तरुण-तरुणींना, आबालवृद्धांना मौजमजा व आनंदाची पर्वणीच.

Cumbarjua Sangod Utsav | Dainik Gomantak