पावसामुळे IPL Final इतिहास पहिल्यांदाच घडलं असं काही

Pranali Kodre

आयपीएल 2023 अंतिम सामना

आयपीएल 2023 स्पर्धेचा अंतिम सामना 28 मे रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार होता.

GT vs CSK | www.iplt20.com

पावसाच्या सरी

पण रविवारी अहमदाबादमध्ये संध्याकाळी सातत्याने पाऊस पडत होता. रात्री साधारण 11 वाजले तरी पावसाच्या सरी बरसत होत्या. त्यामुळे मैदानही ओले झाले होते.

IPL 2023 Final Rain | www.iplt20.com

राखीव दिवस

अखेर पावसाचा अडथळा आल्याने हा अंतिम सामना राखीव दिवशी म्हणजे 29 मे रोजी खेळवण्याचा निर्णय सामनाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

IPL 2023 Final Rain | www.iplt20.com

पहिल्यांदाच घडलंय...

त्यामुळे आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले आहे की अंतिम सामना राखीव दिवशी खेळवला जाणार आहे.

IPL 2023 Final Rain | www.iplt20.com

किती वाजता सुरुवात?

आता राखीव दिवशी देखील संध्याकाळी 7.30 वाजता या अंतिम सामन्याला सुरुवात होईल. तसेच त्याआधी नाणेफेक होईल.

IPL 2023 Final Rain | www.iplt20.com

तिकिटांचं काय?

तसेच सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांना त्यांची तिकिट्स नीट ठेवण्याची विनंती करण्यात आली असून या तिकिट्सनुसारच राखीव दिवशीही प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश करता येणार आहे.

IPL 2023 Final Rain | www.iplt20.com

सामना रद्द झाला तर...

दरम्यान, जर राखीव दिवशीही पावसामुळे सामना पूर्ण झाला नाही, तर गुणतालिकेत गुजरात टायटन्स चेन्नई सुपर किंग्सच्या पुढे अव्वल स्थानावर असल्याने त्यांना विजेते घोषित केले जाईल.

IPL 2023 Final Rain | www.iplt20.com

जिंकणार कोण?

अंतिम सामन्यात जर चेन्नई सुपर किंग्सने विजय मिळवला तर हे त्यांचे आयपीएलमधील पाचवे विजेतेपद असेल. तसेच गुजरात टायटन्सने विजय मिळवला, तर त्यांचे हे सलग दुसरे आयपीएल विजेतेपद असेल.

CSK vs GT | www.iplt20.com
Suryakumar Yadav | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी