दैनिक गोमन्तक
आपण आपल्या भावना वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करत असतो.
रडणे ही माणसाच्या आयुष्यातील महत्वाची प्रक्रिया आहे.
अनेकदा रडणाऱ्यांना कमजोर समजले जाते. मात्र रडणारी सगळेच कमकुवत मनाचे असत नाहीत. रडण्याचे काही फायदे देखील आहेत.
रडण्यामुळे ऑक्सीटोसिन आणि एंडोर्फिन रसायन शरीरात तयार होते. जे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. त्यामुळे तुम्हाला दु:ख झाले असेल, राग आला असेल तर त्यातून तुमची सुटका होते.
त्यामुळे अनेक अभ्यासातून असे समोर आले आहे की, तुम्ही मानसिक आणि शारिरिकदृष्ट्या मजबूत होता.
मात्र सतत रडत राहणे तुमच्या आरोग्याच्यादृष्टीने अजिबात योग्य मानले जात नाही. यामुळे तुम्ही नैराश्यात जाण्याची शक्यता आहे.
त्यामुळे जेव्हा तुम्हाला रडण्याची इच्छा होते तेव्हा तुम्ही त्यावेळी व्यक्त झाले पाहिजे असे तज्ञ सांगतात.