ख्रिस्तियानो रोनाल्डोचे क्लब करियरमध्ये 500 गोल्स

Pranali Kodre

दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने त्याच्या क्लब कारकिर्दीत 500 गोल्सचा टप्पा पार केला आहे.

Cristiano Ronaldo | Dainik Gomantak

38 वर्षीय रोनाल्डोने सौदी लीगमध्ये अल नासरकडून अल वेहदाविरुद्ध खेळताना हा पराक्रम केला.

Cristiano Ronaldo | Dainik Gomantak

9 फेब्रुवारीला झालेल्या या सामन्यात रोनाल्डोने शानदार खेळ करत 4 गोल नोंदवले आणि अल नासरला विजय मिळवून दिला.

Cristiano Ronaldo | Dainik Gomantak

त्यामुळे आता रोनाल्डोच्या नावावर अल नासर या सौदी अरेबियन क्लबसाठी 5 गोल झाले आहेत.

Cristiano Ronaldo | Dainik Gomantak

त्यामुळे रोनाल्डोच्या नावावर आता क्लब कारकिर्दीत 503 गोलची नोंद झाली आहे,

Cristiano Ronaldo | Dainik Gomantak

रोनाल्डोने हे 503 गोल पाच वेगवेगळ्या क्लबसाठी 5 वेगवेगळ्या लीगमध्ये खेळताना केले आहेत.

Cristiano Ronaldo | Dainik Gomantak

रोनाल्डोने रियाल मद्रिदसाठी 311, मँचेस्टर युनायडेटसाठी 103, युवेंटससाठी 81, स्पोर्टिंग लिब्सनसाठी 3 आणि आता अल-नासरसाठी 5 गोल केले आहेत.

Cristiano Ronaldo | Dainik Gomantak

याशिवाय रोनाल्डोने अल वेहदाविरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील 61 वी हॅट्रिकही नोंदवली.

Cristiano Ronaldo | Dainik Gomantak
Rohit Sharma | Dainik Gomantak
आणखी बघण्यासाठी