बर्थडेला ODI क्रिकेटमध्ये शतकी धमाका करणारे 5 क्रिकेटर

Pranali Kodre

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत २० ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला ६२ धावांनी पराभूत केले.

Australia Cricket | ICC

या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श यांनी शतके केली.

Mitchell Marsh | ICC

दरम्यान, २० ऑक्टोबर २०२३ रोजी मिचेल मार्श त्याचा ३२ वा वाढदिवस देखील साजरा करत होता.

Mitchell Marsh | ICC

त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी वनडेत शतक करणारा तो एकूण ५ वाच खेळाडू ठरला. तसेच वर्ल्डकपमध्ये वाढदिवशी शतक करणारा दुसराच खेळाडू ठरला.

Mitchell Marsh | ICC

यापूर्वी केवळ रॉस टेलरने वर्ल्डकपमध्ये वाढदिवशी शतक केले होते. त्याने २०११ मध्ये ८ मार्च रोजी त्याच्या वाढदिवशी पाकिस्तानविरुद्ध १३१ धावांची खेळी केली होती.

Ross Taylor | ICC

याशिवाय वनडे क्रिकेटमध्ये वाढदिवशी शतक करण्याचा कारनामा सर्वात आधी विनोद कांबळीने केला होता. त्याने १८ जानेवारी १९९३ रोजी आपल्या वाढदिवशी इंग्लंडविरुद्ध जयपूरला झालेल्या वनडेत १०० धावांची खेळी केलेली.

Vinod Kambli | Dainik Gomantak

सचिन तेंडुलकरचेही या यादीत नाव असून त्याने २४ एप्रिल १९९८ रोजी त्याच्या वाढदिवशी शारजाहला ऑस्ट्रेलियाविरुद्ध १३४ धावांची खेळी केली होती.

Sachin Tendulkar | Twitter/ICC

श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू सनथ जयसूर्याने ३० जून २००८ रोजी त्याच्या वाढदिवशी आशिया चषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध १३० धावांची खेळी केली होती.

Sanath Jayasuriya | ICC

मुल्तानचा सुल्तान 'विरेंद्र सेहवाग'

Virender Sehwag | X
आणखी बघण्यासाठी