Pranali Kodre
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 25 ऑक्टोबर ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सला तब्बल 309 धावांनी पराभूत केले.
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने शतक झळकावले.
वॉर्नरने या सामन्यात 93 सामन्यात 104 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 11 चौकार आणि 3 षटकार मारले.
वॉर्नरचे हे वनडे कारकिर्दीतील 22 वे शतक होते. त्याने 153 व्या डावात खेळताना हे शतक केले.
त्यामुळे तो सर्वात जलद 22 वनडे शतके करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.
या यादीत अव्वल क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला आहे, त्याने 126 डावात 22 वनडे शतके केली होती.
दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या विराट कोहलीने 143 डावात 22 वनडे शतके केली होती.
तिसऱ्या क्रमांकावर आता वॉर्नर असून त्याच्याखाली चौथ्या क्रमांकावर एबी डिविलियर्स आहे. त्याने 186 डावात 22 वनडे शतके केली होती.
पाचव्या क्रमांकावर असलेल्या रोहित शर्माने 188 डावात 22 शतके केली होती.