Pranali Kodre
वाराणसी हे भारतातील प्रसिद्ध शहर असून या शहराला सांस्कृतिक वारसाही लाभला आहे. आता याच शहरात मोठे क्रिकेट स्टेडियम उभे राहाणार आहे.
दरम्यान या स्टेडियमच्या डिजाईनचे फोटो सध्या व्हायरल झाले असून या फोटोमध्ये महादेवांच्या संबंधिक गोष्टींची झलक पाहायला मिळत आहे.
रिपोर्ट्सनुसार स्टेडियमचा आकार अर्धचंद्रासारखा दिसणार आहे, जसा भगवान शंकराच्या माथ्यावर अर्धचंद्र असतो.
त्याचबरोबर फ्लड लाइट्सचा आकार त्रिशूलसारखा आहे.
तसेच स्टेडियमच्या गेटला बेल पत्रांची डिझाईन आहे.
पॅव्हेलियन डमरुच्या आकाराचा बनवण्यात आला आहे.
या स्टेडियमची पायाभरणी २३ सप्टेंबर रोजी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केली जाणार आहे.
या स्टेडियमला तयार होण्यासाठी साधारण २ वर्षे कालावधी लागणार असल्याचे समजले जात आहे.