Pranali Kodre
पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये आशिया चषक 2023 स्पर्धा 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान खेळवली गेली.
ही 16 वी आशिया चषक स्पर्धा वनडे क्रिकेट स्वरुपात खेळवली गेली असून या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेला 10 विकेट्सने पराभूत केले. याबरोबरच आठव्यांदा ही स्पर्धा जिंकली.
आशिया चषक स्पर्धेत आत्तापर्यंत भारतीय संघाचा दबदबा राहिला आहे.
भारतीय संघाने सर्वधिक 8 वेळा आशिया चषकाचे विजेतेपद जिंकले आहे.
भारताने 1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016, 2018 आणि 2023 असे 8 वेळा आशिया चषकाचे विजेतेपद मिळवले आहे.
भारतापाठोपाठ श्रीलंकेने 6 वेळा आशिया चषक जिंकला आहे.
श्रीलंकेने 1986, 1997, 2004, 2008,2014,2022 असे 6 वेळा विजेतेपद जिंकले आहे.
पाकिस्तानने 2000 आणि 2012 असे 2 वर्षे आशिया चषक जिंकला आहे.